शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! १६ व्या मजल्यावरून बास्केटबॉल खेळता खेळता पडली मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 15:46 IST

Fall Down from 16th Floor : पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगी अतिशय मनमिळाऊ स्वभावाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

नोएडा: नोएडाच्या सेक्टर 74 मध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये 11 वर्षांची मुलगी संशयास्पद परिस्थितीत 16 व्या मजल्यावरून पडली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता मुलीच्या पडण्याबाबत चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगी अतिशय मनमिळाऊ स्वभावाची असल्याचे सांगण्यात येत आहे.सेक्टर 113 पोलिस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, रवी शर्मा अजनारा ग्रँड सोसायटीमध्ये 16व्या मजल्यावर कुटुंबासह राहतात. त्यांची 11 वर्षांची मुलगी स्नेहा सहावीत शिकत होती. शुक्रवारी संध्याकाळी ती फ्लॅटच्या बाहेर बाल्कनीत बास्केटबॉल खेळत होती. यादरम्यान ती 16 व्या मजल्यावरून संशयास्पद परिस्थितीत खाली पडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मुलगी पडताना दिसली. काही वेळातच नातेवाईकांना माहिती देण्यात आली.कुटुंबीयांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. यासोबतच मुलगी कशी पडली याचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.बास्केटबॉल खेळत असताना मुलगी खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप निश्चितपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. सोसायटीच्या फ्लॅटच्या बाल्कनीतील ग्रीलची उंची कमी असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याचा आरोप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने केला आहे. मात्र, ग्रील असल्याने मुलीचा जीव गेला नसता असं बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीDeathमृत्यू