तरुणीने केला नंबर ब्लॉक, तरीदेखील पाठलाग करत अत्याचार!

By योगेश पांडे | Published: February 9, 2024 05:04 PM2024-02-09T17:04:21+5:302024-02-09T17:04:35+5:30

शुभम कृष्णाजी सोनुले (३१, कोतवाली) असे आरोपीचे नाव आहे.

The girl blocked the number, but still followed and tortured! | तरुणीने केला नंबर ब्लॉक, तरीदेखील पाठलाग करत अत्याचार!

तरुणीने केला नंबर ब्लॉक, तरीदेखील पाठलाग करत अत्याचार!

नागपूर : जुन्या प्रियकराचे वागणे चांगले नसल्याने एका तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडत नंबरदेखील ब्लॉक केला. मात्र त्यानंतरदेखील त्याने त्रास देणे सुरू ठेवले व संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शुभम कृष्णाजी सोनुले (३१, कोतवाली) असे आरोपीचे नाव आहे. त्याची १० वर्षांपासून एका तरुणीशी मैत्री होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र शुभमची संगत बरोबर नसल्याने व त्याचे वागणे ठीक नसल्याने तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तिने त्याचा फोन क्रमांकदेखील ब्लॉक केला. मात्र त्यानंतरदेखील शुभम तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ करायचा. तिचा त्याने अनेकदा पाठलागदेखील केला. बऱ्याच वेळा त्याने तिला गाठून तिला मारहाणदेखील केली. 

ऑगस्ट महिन्यात दुपारी साडेबारा वाजता तो जबरदस्तीने तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला. हा प्रकार पोलिसांपर्यंत नेला तर बदनामी होईल या विचाराने ती गप्प बसली. मात्र शुभमचा त्रास वाढतच असल्याने अखेर तिने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: The girl blocked the number, but still followed and tortured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.