शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:59 IST

घटनेनंतर आरोपी वडील दिलीप पंडित फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका वडिलांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात तीन महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा तीन महिन्यांचा भाऊ कार्तिक गंभीर अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना जिल्ह्यातील कुधनी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपूर चिकणी गावात घडली आहे.

निष्पाप मुलांवर धारदार शस्त्राने हल्लामाधोपूर चिकणी गावातील रहिवासी दिलीप पंडित यांचा बुधवारी रात्री (१२ जून २०२५) त्यांच्या पत्नीसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दिलीप पंडितने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. संतापाच्या भरात त्याने आपल्या दोन निष्पाप मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात त्याची तीन महिन्यांची मुलगी जागीच मरण पावली. तर, त्याचा दुसरा तीन महिन्यांचा मुलगा कार्तिक गंभीर जखमी झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आरोपी वडील फरारघटनेनंतर आरोपी वडील दिलीप पंडित फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. एसपी विद्यासागर यांनी घटनेची पुष्टी केली आहे. "एका वडिलांनी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली आहे. दुसरा मुलगाही तीन महिन्यांचा असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत," असे एसपी विद्यासागर यांनी सांगितले. कुधनी पोलीस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहेत.

आरोपीच्या आजीने सांगितले की, पती-पत्नीमध्ये नेमके काय घडले, हे त्यांना माहिती नाही. दिलीप बुधवारी बाजारातून परतला तेव्हा तो खूप रागात होता. विशेष म्हणजे, मुलांच्या आईने या घटनेबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आणि 'काहीही झाले नाही' असे म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार