पेरू बदलून दिला नाही म्हणून ग्राहकाने फेरीवाल्याचे डोके फोडले

By धीरज परब | Updated: October 7, 2023 13:42 IST2023-10-07T13:42:07+5:302023-10-07T13:42:12+5:30

मीरारोड - ग्राहकास पेरू बदलून देण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्याच्या डोक्यात लोखंडी वजनमाप मारून जखमी करणाऱ्या ग्राहक विरुद्ध काशीमीरा पोलिसांनी ...

The customer smashed the hawker's head for not replacing the guava | पेरू बदलून दिला नाही म्हणून ग्राहकाने फेरीवाल्याचे डोके फोडले

पेरू बदलून दिला नाही म्हणून ग्राहकाने फेरीवाल्याचे डोके फोडले

मीरारोड - ग्राहकास पेरू बदलून देण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्याच्या डोक्यात लोखंडी वजनमाप मारून जखमी करणाऱ्या ग्राहक विरुद्ध काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

पेणकरपाडा, किसन नगरीत राहणारा सोनू ग्यानबाबू मौर्या हा फेरीवाला जवळच्या पांडुरंग वाडी येथे हातगाडीवर पेरू विक्री करतो .  शोबित नावाचा तरुण हा सोनू कडे २० रुपयांचे पेरू घेण्यासाठी आला . सोनू याने त्याला पेरू कापून मीठ मसाला लावून दिले . 

थोड्यावेळाने शोबित याने त्याच्या आईला बोलावून आणले. हा पेरू चांगला नाही, मला दुसरा पेरू बदलून दे असे त्यांनी सांगितले. मात्र सोनू याने दुसरा पेरू देण्यास नकार दिला. त्यावरून वादावादी होऊन शोबित याने हातगाडीवरील १ किलोच्या वजनाचे लोखंडी माप उचलून सोनूच्या डोक्यात मारले. त्याच्या डोक्यास जखम होऊन रक्त वाहू लागले. प्राथमिक उपचार करून घेतल्यावर सोनू याच्या फिर्यादी वरून ६ ऑक्टोबर रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात शोबित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अन्वर शेख तपास करत आहेत . 

Web Title: The customer smashed the hawker's head for not replacing the guava