शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 21:18 IST

Rape Case : मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे.

दक्षिण-पूर्व दिल्लीतील बदरपूर भागात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यासोबतच त्याने मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी दाताने चावा घेतल्याचे क्रूर कृत्य देखील नराधमाने केले. मुलीच्या अंगावर चावल्यामुळे 20 हून अधिक जखमेच्या खुणा आहेत. मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी तिच्या आईसोबत बदरपूर परिसरात राहते. वडील खूप पूर्वी दोघांना सोडून गेले होते. मुलीची आई एका कारखान्यात काम करून कुटुंब चालवते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही महिला ड्युटीवर गेली होती. संध्याकाळी ती परत आली तेव्हा मुलीला रक्तस्त्राव झाला होता आणि तिच्या अंगावर चाव्याच्या खुणा होत्या. मुलगी घाबरली होती. आईने मुलीला काय झाले विचारले असता मुलीने सांगितले की, इमारतीत राहणाऱ्या काकांनी तोंड दाबून जबरदस्तीने खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप

मुलीच्या शरीराचा असा एकही भाग नाही, जिथे आरोपीने चावा घेतला नसेल. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी खूप घाबरली असून तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी मुलीला त्यांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. पलवल येथून आरोपीला अटक करण्यात आलीदक्षिण-पूर्व जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती 15 जूनला मिळाली होती. पीडितेला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, जगदीशपुरा, आग्रा येथे राहणारा राहुल हा दोन दिवसांपूर्वी इमारतीत राहायला आला होता. आरोपी राहुलने तिच्या मुलीवर बलात्कार केला आहे. बदरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी एसआय राजीव गौतम यांच्या देखरेखीखाली चार पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री मोबाईलच्या आधारे राहुलला त्याच्या मावशीच्या घरातून बामिनीखेडा जिल्हा पलवल हरियाणा गावातून अटक केली. राहुलला ड्रग्जचे व्यसन आहे. मुलीने आरडाओरडा केल्यावर तिलाही मारहाण करण्यात आलीअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मुलगी प्रचंड घाबरली आहे. एकुलत्या एक मुलीची अवस्था पाहून तिच्या आईची अवस्था बिकट आहे. आरोपीने चुकीचे कृत्य करताना तोंडात कापड कोंबल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. ती वेदनेने रडू लागली तेव्हा आरोपींनी तिलाही मारहाण केली.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक