शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
2
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
3
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
4
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
5
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
6
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
7
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
8
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!
9
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
10
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
11
Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार?
12
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
13
"मुंबई बंद अन् माझी गाडी रस्त्यात बंद पडली, लक्ष्याने...", अलका कुबल यांनी सांगितला अभिनेत्याचा 'तो' किस्सा
14
Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर
15
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
16
बँकेचे हप्ते थकले, राहतं घर गेलं, पण..; आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला..
17
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
18
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
19
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
20
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!

पत्नीवर गोळीबार करुन खून केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाचाही मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Published: September 02, 2023 4:03 AM

खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडले. 

ठाणे : ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचा मोठा भाऊ बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० ते ११  वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेच्या धक्क्याने त्यांचाही काही अंतराने मृत्यू झाला आहे. ते रक्ताच्या थारोळयात पडल्याने त्यांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे चित्र सुरुवातीला पोलिसांनाही आढळले होते. मात्र, नंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यावर गोळीबार झालेला नसल्याचे कळवा पोलिसांनी सांगगितले. 

कळवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आणि त्यांची पत्नी प्रमिला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटूंबिक वाद सुरु होते. याच वादातून त्यांनी त्यांच्या  परवानाधारक र्व्हिाॅल्वरमधून प्रमिला हिच्यावर शुक्रवारी रात्री गोळी झाडून तिचा खून केला.  खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त विलास शिंदे आणि कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आदींनी भेट देऊन पाहणी केली.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच दिलीप यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांनी सांगितले. याप्रकरणी दिलीप यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेचा आणि घटनेचा पंचनामा पहाटे उशिरापर्यंत करण्यात येत होता. हत्येमागे आणखीही काही  कारणे आहेत किंवा कसे याचाही तपास करण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी