Join us  

Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:03 PM

Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती.

Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा (Go Digit Insurance) आयपीओ (IPO) आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. कंपनीने २,६५१ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी २५८ ते २७२ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला होता. आणि कंपनीचा शेअर इश्यू प्राइसपेक्षा १४ रुपयांनी वधारला आहे. बीएसईवर तो ३.३५ टक्क्यांनी वधारून २८०.१० रुपयांवर लिस्ट झाला आणि एनएसईवर २८६ रुपयांवर लिस्ट झाला. पण नंतर त्यात थोडी तेजी दिसून आली. 

मिळालेला जबदरस्त प्रतिसाद 

गो डिजिटचा २,६१४.६५ कोटी रुपयांचा आयपीओ १५ ते १७ मे दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता. आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो एकूण ९.६० पट सब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (क्यूआयबी) राखीव असलेला हिस्सा १२.५६ पट, नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्सचा हिस्सा (एनआयआय) ७.२४ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ४.२७ पट सबस्क्राइब झाला होता. 

या आयपीओ अंतर्गत ११२५ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांची फेस व्हॅल्यू असलेले ५,४७,६६,३९२ शेअर्स जारी करण्यात आले आहेत. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना देण्यात आलेत. हे शेअर्स प्रवर्तक गो डिजिट इन्फोवर्क्ससह काही भागधारकांनी विकले होते. त्याचबरोबर नव्या शेअर्सच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशांचा वापर विक्रेते आणि खरेदीदारांचा बेस वाढविण्यासाठी, नवीन बिझनेस लाइन्स सुरू करण्यासाठी, अधिग्रहण आणि डेटाचा वापर करण्यासाठी केला जाईल. 

कंपनीबद्दल माहिती 

डिसेंबर २०१६ मध्ये सुरू झालेली गो डिजिट जनरल इन्शुरन्स मोटर इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, लायबिलिटी इन्शुरन्स आणि विविध प्रकारची इन्शुरन्स प्रॉडक्ट्स ऑफर करते. त्यांच्या बिझनेस लाइन्समध्ये ७४ अॅक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात कंपनीची ७५ ऑफिसेस आहेत. 

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीला १२२.७६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आणखी वाढून २९५.८५ कोटी रुपये झाला. मात्र, त्यानंतर परिस्थिती सुधारली आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीला ३५.५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ बद्दल बोलायचं झालं तर पहिल्या ९ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीला १२९.०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीवर २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूकविराट कोहली