रिवा - मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील चाकघाट पोलीस ठाणे परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या वडिलांनी तिच्या प्रियकराला रॉकेल ओतून जिवंत जाळले आहे. यानंतर तरुणाला गंभीर अवस्थेत रिवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर डॉक्टर उपचार करत आहेत. असे सांगितले जात आहे की, तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी दररोज घरी येत असे. यामुळे संतापलेल्या वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.रिवा जिल्ह्यातील चाकघाट पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रेयसीच्या वडिलांनी रॉकेल ओतून जिवंत जाळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने त्यास संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीच्या वडिलांनी अनेकवेळा तरुणाला घरी येण्यास मनाई केल्याचे सांगितले जात आहे. असे असूनही तो यायचा.या महिलेचे घर चाकघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. एएसपी शिवकुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या पतीला सोडून वडिलांच्या घरी राहत होती. येथे तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे प्रियकर असलेला तरुण तिला भेटण्यासाठी रोज घरी येऊ लागला. याचा राग येऊन पित्याने प्रियकराला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:03 IST