वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला

By धीरज परब | Updated: November 21, 2022 22:14 IST2022-11-21T22:14:40+5:302022-11-21T22:14:53+5:30

एक महिला विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन विना हेल्मेट येत आल्याने तिला कारवाईसाठी थांबवले व तिचे गाडीसह फोटो ई चलान डिव्हाईस मशीन मध्ये काढून दुचाकी ताब्यात घेतली

The bike seized by the traffic police was stolen | वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला

वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला

मीरारोड - वाहतूक पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली दुचाकी चोरीला गेल्या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काशीमीरा वाहतुक शाखेतील महिला पोलीस अंमलदार सुलभा होनमाने ह्या शनिवारी सायंकाळी मीरारोडच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर डॉमिनोज पिझा समोर  विरुद्ध दिशेने दुचाकी मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्या कारवाई करत होत्या. 

त्यावेळी एक महिला विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन विना हेल्मेट येत आल्याने तिला कारवाईसाठी थांबवले व तिचे गाडीसह फोटो ई चलान डिव्हाईस मशीन मध्ये काढून दुचाकी ताब्यात घेतली . तिच्या कडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता तो न देता ती महिला पळून गेली. कारवाई केलेली दुचाकी तिकडेच ठेऊन सुलभ ह्या वाहतूक नियंत्रण साठी मुख्य नाक्यावर गेल्या व काहीवेळाने परत आल्या . तेव्हा जप्त केलेली ती दुचाकी जागेवर नव्हती . परिसरात चौकशी केली असता एक महिला व पुरुष असे दोघे आले व त्यांनी दुचाकी घेऊन गेल्याचे समजले. 

Web Title: The bike seized by the traffic police was stolen