शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

मोठा खुलासा; न्यायाधीश आणि पोलीस अधिकारी होते PFIच्या निशाण्यावर, 4 स्टेजमध्ये व्हायची ट्रेनिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 4:18 PM

ट्रेनिंग देणे, ब्रेन वॉश करणे, कायदेशीर प्रकरणांची माहिती देणे आणि कायदेशीर सहाय्य पुरवणे, ही कामे संघटनेकडून केली जायची.

मुंबई: दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन केंद्र सरकारने पीएफआय(PFI) संघटनेवर बंदी घातली आहे. या पीएफआयबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. औरंगाबाद एटीएसने पीएफआय प्रकरणात न्यायालयासमोर मोठा खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या निशाण्यावर काही न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे एटीएसने न्यायालयाला सांगितले आहे. 

पगार दिला जायचाअटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यातही लाखो रुपये जमा करण्यात आल्याचे एटीएसने म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रशिक्षणही देण्यात आले आले. शिवाय, जे पीएफआयमध्ये सहभागी व्हायचे, त्यांना पगारही दिला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. म्हणजेच पीएफआयच्या सदस्यांना सर्वतोपरी मदत केली जात होती.

या गोष्टींची माहितीएटीएसने न्यायालयाला सांगितले की, पीएफआयमध्ये नव्याने भरती झालेल्यांना भरतीनंतर चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात ब्रेन वॉशिंग करणे, कायदेशीर बाबींची माहिती देणे आणि कोणी एखाद्या प्रकरणात अडकला, तर त्याला सर्वोच्च न्यायालयात मोठा वकील देणे. पीएफआय या योजना अगोदर तयार ठेवत असे.

प्रशिक्षणाचे चार टप्पे

पहिला- कोणताही नवीन सदस्य जोडण्यापूर्वी त्याचे 4 महिने निरीक्षण केले जायचे. त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती काढली जायची आणि 20 लोकांपैकी फक्त 2 लोकांना सदस्य बनवण्यात यायचे.

दुसरा- ज्या दोघांना सभासद बनवण्यात आले, त्यांना 6 महिन्यांत स्वतःला सिद्ध करावे लागायचे. हे लोक आपल्या धर्मासाठी किती कट्टर आहेत, याची चाचपणी व्हायची. सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज लिहिण्याचे प्रशिक्षणही दिले जायचे.

तिसरा- महाराष्ट्र आणि केरळमध्ये तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जायचे. कायमस्वरूपी सहभागी झालेल्या सदस्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण असयाचे. सदस्यांना त्यांची घरे आणि कुटुंबे सोडून द्यावी लागायची. त्या बदल्यात त्यांना पैशांशिवाय आवश्यक ते सर्व देण्यात आले. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या घराचा खर्चही संघटनेकडून केला जायचा.

चौथा- सदस्यांना आंतरराष्ट्रीय दुवे तयार करण्याची जबाबदारी दिली जायची. आंतरराष्ट्रीय लिंक तयार करून निधी जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्टेज फोरच्या सदस्यांना कोणत्याही दहशतवादी कटात मदत करण्याबाबतही माहिती दिली जायची. एटीएसने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच टक्के सदस्य स्टेज-3 पर्यंत पोहोचू शकले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस