जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दोघे करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By अण्णा नवथर | Updated: October 6, 2023 15:04 IST2023-10-06T15:02:23+5:302023-10-06T15:04:35+5:30
हर्षद गायकवाड, बाळु शंकर काळे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दोघे करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : मनमाड रोडवरील बंद पडलेल्या शेडमध्ये नेत भांडणाच्या कारणातून धारदार शस्त्राने वार करत मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. हर्षद गौतम गायकवाड ( रा.दूध डेअरी चौक, विखे पाटील कॉलेज रोड, वडगाव गुप्ता शिवार ता. जि. अहमदनगर) बाळु शंकर काळे, (रा.चेतना कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नवनागापूर येथील नामे महेश बाबासाहेब आरु यांना वरील आरोपींनी मनमाड रोडवरील एका बंद शेडमध्ये नेले. तिथे आरोपींनी फिर्यादी यांना धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. वरील दोघे आरोपी विळद बायपास येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद पकडला गेला.