शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार मुलांच्या आईचा ३० वर्षांचा बॉयफ्रेंड, लग्न करण्यासाठी सुनांचे दागिने घेऊन महिला झाली गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:11 IST

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण, प्रेमासाठी संसार उधळून लावल्याची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण, प्रेमासाठी संसार उधळून लावल्याची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या ललितपुरमधून देखील एक असेच प्रकरण समोर आले आहे. याच भागात राहणारी एक वयस्कर महिला तिच्या ३० वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली. इतकंच नाही तर, जाताना तिने आपल्या चारही सुनांचे दागिने देखील सोबत नेले. सध्या ही प्रकरण आजूबाजूच्या परिसरांत चांगलेच चर्चेत आले आहे. 

चार मुलगे आणि चार सुना असा मोठा परिवार!

उत्तर प्रदेशच्या बुंडेलखंडमधील ललितपुर भागातील जखौरा गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या एका महिलेला चार मुलगे असून, त्या चारही जणांची लग्न झालेली आहेत. घरात चार सुना असणारी ही महिला एका ३० वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि घरातून पळून गेली. घरातून पळून जाताना ही महिला आपल्यासोबत चारही सुनांचे स्त्रीधन अर्थात सगळे दागिने घेऊन पसार झाली. पीडित कुटुंबाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे आता पीडित कुटुंबाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. 

कुटुंबाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

या संदर्भात माहिती देताना महिलेच्या पतीने सांगितले की, आमचा संसार सोडून माझी पत्नी ३० वर्षांच्या एका तरुणासोबत घरातून पळून गेली. गेल्या २० दिवसांपासून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. मात्र, काहीच ठिकाणा कळत नाहीये. आम्ही पोलिसांकडे या बाबत तक्रार नोंदवली असून, त्यांनीही यात कोणती कारवाई केलेली नाही. 

पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने आता कुटुंबाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आपल्या वेदना सांगितल्या आहेत. आपल्या परिवाराला न्याय मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे, ३० वर्षांचा तरुण देखील आधीच विवाहित असून, त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. माझ्या पतीला शोधून आणा, अशी मागणी त्या तरुणाच्या पत्नीने केली आहे. या प्रकारामुळे समाजात आपली बदनामी होत असल्याचे, दोन्ही कुटुंबांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश