शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

१० महिन्यांचं बाळ रुग्णालयातून गेले चोरीला, रडून-रडून आईची अवस्था झाली बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:53 IST

10 Months Old Baby Stolen : डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या महिलेच्या स्वाधीन केले आणि ते औषध घेण्यासाठी गेले.

मिर्झापूर : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील मंडल हॉस्पिटलमधून १० महिन्यांचे बाळ चोरीला गेले आहे. सीसीटीव्ही खराब असल्यामुळे मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाचा शोध सुरू केला. गुरुवारी दुपारी लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बामी गावातील एक कुटुंबातील सदस्य आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांना भेटण्यासाठी आले होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या महिलेच्या स्वाधीन केले आणि ते औषध घेण्यासाठी गेले. ती व्यक्ती परत आली तेव्हा बाळ बेपत्ता असल्याचे त्याने पाहिले. मुलं बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने रुग्णालयाच्या विभागात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी लालगंजमधील बामी गावात राहणारे विजय कुमार आणि त्यांची भाची सोनी १० महिन्यांच्या मुलावर उपचारासाठी रुग्णालयात आले होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर शेजारी बसलेल्या महिलेला बाळ दिल्यानंतर भाची सोनी औषध घेण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्या वेळाने ती परत आली तेव्हा मुलगा बेपत्ता होता. बराच शोध घेऊनही बालक सापडले नाही. मूल चोरीला गेल्याने रुग्णालयाच्या विभागात एकच खळबळ उडाली आहे.माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. एएसपी संजय वर्मा यांनी सांगितले की, एक कुटुंब आपल्या मुलाला डॉक्टरांना दाखवण्यासाठी आले होते. नंतर रुग्णालयातूनच मूल चोरीला गेल्याची माहिती मिळाली. मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी शोध सुरू आहे. तर दुसरीकडे मूल चोरीला गेल्याने आईची रडून रडून हालत खराब झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलcctvसीसीटीव्ही