Marathi Crime News: आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने हॉटेलच्या रुममध्ये पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. बंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतल्यानंतर पोलिसही हादरले. ही तरुणी तिच्या काका-काकूकडे राहत होती. तिचे काही प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काकाला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. या तरुणीला तिच्या काकाने हॉटेलवर बोलवलं होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला तिचे काका आणि काकूकडून प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ आईवडिलांना पाठवू असे धमकी देत होते आणि तिला ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे ही तरुणी डिप्रेशनमध्ये गेली होती.
पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणीच्या काका आणि काकूला अटक केली आहे.
काकाने बोलवलं होतं हॉटेलच्या रूममध्ये
आत्महत्येची घटना रविवारी घडली. तरुणीने बंगळुरूतील कुंडलाहल्ली मेट्रो स्टेशनजवळ राधा होमटेल नावाचे हॉटेल आहे. हॉटेलच्या रुममध्ये तरुणीने आत्महत्या केली. या रुममध्ये तरुणीला तिच्या काकाने बोलवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त शिवकुमार गुनार यांनी सांगितले की, तरुणीला तिच्या काकाला हॉटेलमध्ये भेटायचं नव्हते. पण, तिच्या काकाने प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ तुझ्या आईवडिलांना पाठवेन अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी हॉटेलवर गेली.
हॉटेलवर जाताना सोबत घेतले पेट्रोल
काकाने हॉटेलवर बोलवल्यानंतर तरुणी तयार झाली. तिने सोबत पेट्रोलही घेतले. हॉटेलच्या रूममध्ये जाताच तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल शिंपडून घेतले आणि पेटवून घेतले. ही घटना घडल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तरुणीला आग विझवली आणि रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
तरुणीच्या आईने पोलिसांना सांगितले की, माझी मुलगी मागील ६ वर्षांपासून काका आणि काकूसोबत राहत होती. ते सोबत फिरायलाही जायचे. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या काकाकडून पेनड्राईव्ह जप्त केला आहे.