शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात; मेहता प्रकरणी आरोपीला अजूनही अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 21:55 IST

२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता.

मीरारोड - भाजपाचा माजी आमदार नरेंद्र मेहता सह त्याचा साथीदार संजय थरथरे वर दाखल बलात्कार व एट्रॉसीटीच्या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीसांकडेच आहे. १२ दिवस झाले तरी दुसरा आरोपी पोलीसांना सापडलेला नाही. मेहता देखील पोलीसांना सापडला नव्हता.

५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने, मेहता तपासात सहकार्य करत असल्यास कठोर कारवाई करु नका असे आदेश देत दिलासा दिला होता. आता साथीदार थरथरेने देखील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागीतली असुन बुधवारी त्यावर सुनावणी आहे. त्यामुळे एकुणच ठाणे ग्रामीण पोलीसांच्या भुमिके बद्दल संशय व्यक्त होत आहे. तर मेहताला तपासकामी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलीसांनी बजावली असल्याचे सुत्रांनी सांगीतले.२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता. परंतु ठाणे ग्रामीण पोलीसांना १२ दिवस उलटले तरी थरथरेचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. तर मेहता देखील पोलीसांच्या हाती न लागता ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर शहरात फिरु लागला आहे. त्यातच आता थरथरे याने देखील उच्च न्यायालयात दाद मगीतली असुन उद्या बुधवार ११ मार्च रोजीची तारीख सुनावणीसाठी दिली आहे.वास्तविक मेहता व थरथरे यांचे ठाणे ग्रामीण पोलीसांशी हितसंबंध आहेत. पोलीसांनी अनेक प्रकरणात आरोपींना पुर्वी देखील पाठीशी घालण्याचे काम केले आहे. तक्रारींची दखल न घेणे, तक्रार असताना गुन्हा दाखल न करणे, त्यांना अटक न करणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या वरिष्ठ अधिकारायां सोबत आरोपींचे घनिष्ठ संबंध असल्याचे काही व्हायरल फोटों वरुन दिसुन आले आहे. मेहता वर अनेक गुन्हे दाखल असुन देखील दोन दोन कार्बाईनधारी पोलीस बंदोबस्ताला दिलेले होते. या बाबतच्या तक्रारी देखील वरिष्ठ पोलीस अधिकारायां पासुन शासन स्तरावर झालेल्या आहेत.आरोपी हे भाजपा नगरसेवक प्रशांत दळवीची गाडी घेऊन फिरत असल्याचे एका जागरुक नागरिकाने काढलेल्या व्हिडिओ मुळे पोलीसांना माहिती मिळाली होती. नंतर पोलीसांनी दळवी यांची आलिशान एमएच ०४ जेजे ५२५२ क्रमांकाची गाडी जप्त करुन पोलीस ठाण्या बाहेर आणुन ठेवली आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर पिडीत नगरसेविकेला भ्रमणध्वनी वरुन धमक्या आल्याने त्याचा सुध्दा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. शासना कडुन सदर गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुनहे शाखेचे उपायुक्त यांच्या कडे देण्याचे जाहिर केले असले तरी अजुनही अधिकृत पत्र आले नसल्याने तपास ठाणे ग्रामीण पोलीसां कडेच आहे. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी मेहतास तपासकामी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपाArrestअटक