शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला गॅंगस्टर रवी पुजारीची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:47 IST

पुजारीच्या खबऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक; दोन कोटींच्या खंडणीची मागणी 

ठळक मुद्देपुजारीला या बांधकाम व्यवसायिकाची सर्व माहिती पुरवणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रीक्‍स (21) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ओशिवरा डेपोसमोर राहणाऱ्या रॉड्रीक्‍सविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात हाणामारीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्याचीही प्रक्रिया सुरू होती.

मुंबई -  गोरेगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावासियाकाला गॅंगस्टर रवी पुजारीने धमकीचा दूरध्वनी करून २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुजारीला या बांधकाम व्यवसायिकाची सर्व माहिती पुरवणाऱ्या विल्यम अल्बर्ट रॉड्रीक्‍स (21) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानेअटक केली आहे. याप्रकरणी रॉड्रीक्‍सला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ओशिवरा डेपोसमोर राहणाऱ्या रॉड्रीक्‍सविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात हाणामारीचे गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्याचीही प्रक्रिया सुरू होती. खंडणीप्रकरणी रवी पुजारी आणि  त्याचा भारतातील प्रमुख हस्तकाविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2018 पासून गॅंगस्टर रवी पुजारी स्वतः दूरध्वनी करून या बांधकाम व्यावसायिकाला धमकावत होता. त्याने २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. बांधकाम व्यावसायिक धमक्‍यांना घाबरत नसल्यामुळे त्याने त्याचा भाऊ व वहिनीलाही धमकावण्यास सुरूवात केली. बांधकाम व्यावसियाकाचा परदेशात शिकणारा पुतण्या पुन्हा भारतात आल्यानंतर त्यालाही धमकवण्यात आले होते. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाबाबतची माहिती परिसरातील व्यक्ती पुजारी टोळीपर्यंत पोहोचवत असल्याचा दाट संशय निर्माण झाला. त्याबाबत तपास केला असता रॉड्रीक्‍स ही सर्व माहिती पुरवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खंडणी विरोधीत पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, हवालदार अरुण जाधव यांच्या पथकाने रॉड्रीक्‍सला अटक केली. 

टॅग्स :Anti Extortion Cellखंडणी विरोधी पथकPoliceपोलिसRavi pujariरवि पूजारीArrestअटक