शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

Pakistan Terrorist Module: पाकिस्तानात घेतलं होतं रेल्वे ब्रिज उडवण्याचं ट्रेनिंग, ९३च्या सीरियल ब्लास्टसारखा होता प्लान, तपासात मोठे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 14:25 IST

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला.

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून ( Delhi Police Special Cell) कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल ( Pakistan Terrorist Module) उधळून लावल्यानंतर आता आणखी नवीन खुलासे होत आहेत. 

Delhi Police Special Cellच्या सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. या प्रकरणात आता स्लीपर सेलची भूमिकाही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती.  (The terrorists who were part of the recently busted Pak-organised terror module were given training in blowing up railway tracks and bridges. Large gatherings were also on their target. The role of sleeper cells has also emerged: Delhi Police Special Cell sources) 

हे दहशतवादी १९९३च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टसारखीच योजना आखण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केल्यनंतर एकत्र यायचे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या धमाक्यासाठी ते RDXचा वापर करणार होती. या लोकांना ओमान येथून एका बोटीतून समुद्रीमार्गानं इराणच्या समुद्री सीमेपर्यंत आणले गेले आणि त्यानंतर दुसऱ्या बोटीतून गांदरबल येथे पोहोचले. तेथून त्यांना एका फार्महाऊसवर नेण्यात आले.  तेथे त्यांना ट्रेनिंग दिले गेले आणि १५ दिवस तेथे थांबल्यानंतर त्यांना भारतात सीरियल ब्लास्टचा टास्क देऊन परत पाठवण्यात आले.  

आता दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल ओसामाचे काका हुमैद याचा तपास घेत आहेत. तो परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्याविरोधात LOC जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. ओसामाचे वडिलांना दुबईतून भारत आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटिसही पाठवण्याची सीबीआयनं तयारी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय