शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला

By मनीषा म्हात्रे | Updated: February 27, 2023 11:14 IST

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुंबई - २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई हादरली होती. या हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनावर ताज्या आहेत. त्यात आता पुन्हा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं समोर येत आहे. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. 

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचं त्यात म्हटलं आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व आधारकार्डची कॉपीही NIA कडून पोलिसांना मेल द्वारे पाठवलेली आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे.

दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर NIA चे छापेअलीकडेच NIA ने खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले असून, यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देत त्याची एनआयए टीममकडून चौकशी केली जात आहे. हा संशयित इमिटेशन ज्वेलरीचा व्यापारी आहे आणि तो चीनमधून या ज्वेलरीची आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. 

NIA च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्या हवाला लिंक संदर्भात दोन संशयितांना रडारवर ठेवण्यात आले होते. यामुळे चंदीगड एनआयएचे पथक मुंबईत पोहोचले. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेसह आग्रीपाडा भागातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे चौकशीदरम्यान या पथकाला कळले, की त्यांच्या रडारवर असलेल्या मुख्य संशयिताचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तो इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित होता. हे दागिने तो चीनमधून आयात आणि निर्यात करत असे. ही व्यक्ती अनेक गुन्हेगारी कारवायांशी जोडली गेली असल्याने त्यावर पाळत ठेवण्यात आली होती. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerror Attackदहशतवादी हल्ला