शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! अवघा महाराष्ट्र हादरला; लग्नमंडपातून फरपटत घरी आणून लेकीला फासावर चढविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:57 IST

ऑनर किलिंग : वडील व काकांनी सरण रचून घराजवळच जाळला मृतदेह, पोत्यात भरली राख

लोकमत न्यूज नेटवर्क    जालना : गावातील एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी झाली; पण लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्यावरून बिनसले. संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. बदनामीच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकावले. दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. राख दोन पोत्यात भरून ठेवली.  हृदय पिळवटून टाकणारी ही ऑनर किलिंगची घटना जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे बुधवारी उघडकीस आली. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता, तेथे रांगोळी काढल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ऑन द स्पॉट पाहणीत दिसून आले.       

सूर्यकला संतोष सरोदे असे मयत मुलीचे नाव आहे तर संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सूर्यकला ही संतोषची तिसरी मुलगी. ती अकरावीत शिकत होती. चुलत आत्याच्या मुलाचे व तिचे प्रेम जुळले. दोघेही घरातून निघून गेले होते; परंतु घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सांगून पुन्हा घरी बोलावले. मंगळवारी एका मंदिरात त्यांनी दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी बोलावून घेतले; परंतु मुलीच्या काकाने अर्धा एकर शेती मुलीच्या नावावर करण्याची मागणी केली. त्याला नकार मिळाल्याने वडिलांसह काकाने सूर्यकलाला मंडपातून ओढत घरी आणले. 

घराच्या उंबऱ्याजवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकावून फाशी देऊन ठार केले. घरापासून हाकेच्या अंतरावरच सरण रचून  मृतदेह जाळून  टाकला. दोन गोण्यांमध्ये राखही भरून ठेवली. त्या गोण्या गुरुवारीही तेथेच दिसून आल्या.    

घरात शांततासूर्यकला सरोदे हिच्या घरात शांतता दिसून आली. गावातील काही मंडळी भेटण्यासाठी येत होती. तिची आई घरात होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर बहिणीसह घरातील लहान मुले बाहेर बसलेली होती. घटनेच्या वेळी घरातील काही मंडळी हजर होती; परंतु कोणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे.

तीन दिवसांची कोठडी संतोष सरोदे व नामदेव सरोदे या दोघांनाही गुरुवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न