शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Buldhana-Nagpur Bus Accident: बाळापूरमध्ये भीषण अपघात! कोळशाच्या ट्रकला धडक दिल्यानंतर एसटी बसने घेतला पेट; ७ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 5:37 PM

बुलडाणा-नागपूर बसला बाळापूरनजीक अपघात; जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बुलडाणा/बाळापूर: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शेळद फाट्यानजीक बुलडाणा आगाराच्या नागपूरला जाणाऱ्या बसचा आणि कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये बस व ट्रक जळून खाक झाले आहे. दरम्यान या अपघातामध्ये बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये बस चालकाचाही समावेश आहे. (Buldhana-Nagpur Bus Accident)

हा अपघात ६ ऑक्टोबर रोजी झाला. बुलडाणा आगाराची बुलडाणा-नागपूर ही एमएच-४०-एक्यू ६१६० क्रमांकाची बस सकाळी १०:४५ वाजता नागपूरसाठी निघाली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास या बसची आणि कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची (युपी-७०-जीझेड-०५१५) समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर बस व ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये बस जळून खाक झाली. या अपघातामध्ये बसमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवासीदुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यावेळी बाळापूर पोलिसांचे एक वाहन अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खिरपूरी देवगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्तासाठी जात होते. या दरम्यानच बस व ट्रकची धडक होऊन अपघात झाला. बसने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांनी तेथे धाव घेत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चालकासह ७ जखमीया अपघातामध्ये बस चालक एन. टी. लहाने (रा. बुलडाणा) यांना अधिक मार लागला असल्याचे स्थानिकंचे म्हणणे आहे. दरम्यान या बसवर वाहक म्हणून जे. बी. साळवे हे होते. बस चालकासह बसमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमींची नावे मात्र मिळू शकली नाही.

जखमींवर अकोल्यात उपचार सुरूअपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर अकोला येथे उपचार सुरू असून अपघातामध्ये सात प्रवाशी जखमी झाले आहेत. बुलडाणा-नागपूर बस आणि ट्रकला हा अपघात घडला आहे. बसवर चालक म्हणून एन. टी. लहाने आणि वाहक म्हणून जे. बी. साळवे हे कर्तव्यावर होते, अशी माहिती बुलडाण्याचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघात