शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात गेलेल्या आदिवासी महिलेची हत्या झाल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 22:03 IST

Murder Case : नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला.

ठळक मुद्देघटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , उपअधीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.

भिवंडी -  बकऱ्या चरण्यासाठी जंगलात गेलेल्या आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . काटई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगरपाडा मांगत पाडा येथील ३३ वर्षीय आदिवासी महिला गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलार गावाजवळील जोगमोरी या जंगल परिसरात गेली होती . मात्र सदर महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.             

विशेष म्हणजे सकाळी तालुका पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मित निधन म्हणून करण्यात येत असतांना महिलेच्या नातेवाईकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला असता अखेर शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेत शवविच्छेदना साठी शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मात्र घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळून आली असून अंगावरचे दागीने व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यामुळे महिलेवर शारिरीक अत्याचार करून सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर घटनेच्या १८ तासा नंतरही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून आपल्या पत्नीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी मृत महिलेचा पती जीवन दिघे याने केली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , उपअधीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhiwandiभिवंडीWomenमहिलाDeathमृत्यू