शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

''लकी ड्रॉ''चे मानकरी असल्याचे सांगून त्रिकुटाने घातला अभियंत्याला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:21 IST

टोळक्याने निलेशसह अनेक जणांना फसवलं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला

नवी मुंबई - नवी मुंबईत तीन जणांच्या टोळक्याने एका अभियंत्याला ६० हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. निलेश पाटील (वय - ३४) असं त्याच नाव असून तो सीबीडी बेलापूर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या त्रिकुटाचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या टोळक्याने निलेशसह अनेक जणांना फसवलं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

निलेश पाटील हे तळोजा येथील काच बनविण्याच्या कंपनीमध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून काम करतात.  विवेक रघुवंशी, मनीष मेहेता, प्रसाद शेट्टी, असं या टोळीताल तिघांची नावे असून त्यांनी सानपाडा येथील जी स्क्वेअर पार्क या कॉम्प्लेक्समध्ये प्रोग्रेशिआ इंटरनॅशनल हॉलिडे या नावाने भाड्याने ऑफिस सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी या टोळीने निलेश यांना ते लकी ड्रॉचे मानकरी असल्याचं सांगत त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्यांनी निलेश यांना आपल्या कंपनीचे सदस्य होण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली होती. ज्यात एका दिवसासाठी क्लब, ब्युटीपार्लर, जीम त्याचबरोबर हॉलिडेसाठी मोफत राहण्याच्या सेवा यांचा समावेश होता. त्यासाठी त्यांनी निलेश यांच्याकडून तीन वर्षाच्या मेंबरशिपसाठी ६० हजार रुपयांची रक्कम वसूल केली होती. मार्च महिन्यात निलेश यांनी अनेक वेळा त्या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. त्यानंतर एकाशी संपर्क झाल्यानंतर त्याने तेथील नोकरी सोडून दिल्याचं सांगत त्याचा त्या कंपनीशी काही संपर्क नसल्याचं सांगितलं. अखेर निलेश यांना आपली फसवणूक झाल्याच लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पुणे पोलीसही त्या तिघांच्या मागावर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी इतरही पीडितांना त्या संबंधात तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईfraudधोकेबाजीPoliceपोलिस