टिकटॉक व्हिडीओ शूट केला म्हणून तरुणास भररस्त्यात केले विवस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 20:07 IST
तरुणाविरोधात पॉक्सो आणि एसटी एससी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
टिकटॉक व्हिडीओ शूट केला म्हणून तरुणास भररस्त्यात केले विवस्त्र
ठळक मुद्देमुलीने या तरुणाविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.पीडित तरुणाने संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाला विवस्त्र करुन भररस्त्यावर बेल्टने बेदम मारहाण करून दुसऱ्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केला.
राजस्थान - जयपूरमध्ये एका तरुणाला विवस्त्र करुन भररस्त्यावर बेल्टने बेदम मारहाण करून दुसऱ्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केला. या तरुणाने १४ वर्षीय मुलीबरोबर टिकटॉक व्हिडिओ शूट करुन अपलोड केला होता. टिकटॉक व्हिडीओ वायरल झाल्यानंतर मुलीच्या वडील आणि भावाने हे कृत्य केले आहे. या तरुणाविरोधात पॉक्सो आणि एसटी एससी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त मनोज चौधरी यांनी सांगितले की, ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली. त्याने एका १४ वर्षीय मुलीसोबत व्हिडिओ चित्रित करुन तो टिकटॉकवर अपलोड केला होता. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तरुणाला भररस्त्यात कपडे उतरण्यास जबरदस्ती केली आणि बेल्टने मारहाण केली. मुलीने या तरुणाविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
ही घटना जयपूरच्या जवाहर नगर परिसरात घडली. एका तरुणाने अल्पवयीन मुलीबरोबर टिकटॉकवर व्हिडिओ बनवला. दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर मुलीचे वडील नाराज झाले. तिच्या वडील आणि भावाने इतर लोकांच्या मदतीने त्या तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केले. विवस्त्र करुन त्याला रस्त्यावर फिरवले आणि बेल्टने मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा त्यांनी व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओही सोशल मीडियावर वायरल करण्यात आला. पीडित तरुणाने संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर मुलीच्या नातेवाईकांनीही तरुणाविरोधातपॉक्सो आणि एसटी एससी अॅक्टनुसार तक्रार दाखल केली आहे.