शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

पत्नी जवळ येताच बहाणे देत सतत दूर जायचा पती; सत्य समजताच पत्नीच्या पायाखालील जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 3:55 PM

पतीचा फोन तपासून पाहताच पत्नीला बसला धक्का

बंगळुरू: पत्नीपासून सतत दूर राहणाऱ्या पतीबद्दलची धक्कादायक माहिती समोर आल्यानं पत्नीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. तरुणी एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असून पती एका प्रतिष्ठीत बँकेत चांगल्या पदावर काम करत आहे. पतीचा मोबाईल तपासल्यानंतर पत्नीला काही धक्कादायक गोष्टी आढळून आले. त्याच्या स्मार्टफोनमधील ऍप्स पाहून तिला धक्काच बसला. यानंतर पत्नीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

बंगळुरूतील एका प्रख्यात कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या शालिनीचा (नाव बदलल्यात आलंय) जून २०१८ मध्ये एका आघाडीच्या खासगी बँकेत कार्यरत असलेल्या विक्रमशी (नाव बदलण्यात आलंय) विवाह झाला. घरातील वरिष्ठांनी हा विवाह करून दिला. ३१ वर्षांच्या विक्रमचं हे दुसरं लग्न होतं. लग्नानंतर दोघे जयानगरमध्ये राहू लागले. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं पाहत सासरी आलेल्या शालिनीला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.  

पहिल्या पत्नीनं फसवणूक केल्याचं म्हणत त्याच गोष्टींचा विचार करत विक्रम खिन्न व्हायचा. पहिल्या पत्नीनं दिलेल्या धक्क्यातून सावरत असल्याचं कारण देत सुरुवातीला तो शालिनीपासून दूर राहिला. त्यानंतर त्यानं लग्नात हुंडा कमी मिळाल्याचं म्हणत नवा वाद सुरू केला. विक्रमनं काहीवेळा शालिनीवर आरोप केले. लॉकडाऊन सुरू झाल्यानं सोबत वेळ घालवून वाद सोडवता येईल असा विचार शालिनीनं केला. मात्र लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घटनांनी ती आणखी हादरली. 

गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला. त्यावेळी विक्रम सातत्यानं स्मार्टफोनला चिकटलेला असायचा. तो काही गे डेटिंग ऍप्सचा वापर करत असल्याचं शालिनीच्या लक्षात आलं. विक्रमने ऍप्सवर प्रोफाईल तयार केल्याचं शालिनीनं पाहिलं. विक्रमनं काही व्यक्तींसोबत केलेले चॅट्सदेखील तिने बघितले. विक्रम लग्नानंतर लांब लांब का राहत होता याचं उत्तर शालिनीला त्या चॅट्समधून मिळालं. त्यानंतर तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.