शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेरू’च्या निरोप समारंभात पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 16:47 IST

सॅल्यूट देत मोठ्या थाटामाटात पार पडला शेरूचा निरोप समारंभ 

ठळक मुद्दे हा निरोप समारंभ कोणा व्यक्तीचा नव्हे तर चक्क ‘शेरू’ या श्वानाचा होता.रविवारी ‘शेरू’ आपल्या सेवेतून निवृत्त झाला. या निरोपावेळी त्याचा सांभाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले होते.

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी - दहा वर्षानंतर ‘तो’ निवृत्त होणार होता, त्यामुळे त्याच्या निवृत्तीची जय्यत तयारी सुरू होती. त्याच्यासाठी खास फुलांनी गाडी सजविण्यात आली. ‘तो’ दिमाखात चालत आला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ‘सॅल्यूट’ दिला. त्यानंतर त्याच्या पाठीवर मायेची शाल पांघरण्यात आली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. हा निरोप समारंभ कोणा व्यक्तीचा नव्हे तर चक्क ‘शेरू’ या श्वानाचा होता.

रत्नागिरीतील पोलीस दलातील बॉम्ब शोध व नाश पथकात १८ मार्च २००९ रोजी ‘शेरू’ हे श्वान दाखल झाले. त्यानंतर त्याच्या कामाला सुरूवात झाली. पोलीस दलात सहभागी झालेल्या ‘शेरू’ने आपल्या कामाचा ठसा उमटविण्यास सुरूवात केली. गेली दहा वर्ष मंगेश नाखरेकर आणि रणजित जाधव हे ‘हॅण्डलर’ म्हणून काम करत होते. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १०.२० वाजेपर्यंत त्याच्या नित्यक्रमात कधीच खंड पडलेला नाही.

रविवारी ‘शेरू’ आपल्या सेवेतून निवृत्त झाला. त्याच्या निवृत्तीसाठी खास गाडी सजविण्यात आली होती.  सर्व कर्मचारी ही गाडी सजविण्याच्या कामात गुंतलेले होते. तो आल्यानंतर इतर श्वानांनी त्याला सलामी दिली. त्यानंतर तेथील महापुरूषाच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर राऊत यांनी त्यांच्या पाठीवर शाल घालून त्याचा सन्मान केला. यावेळी मंगेश नाखरेकर आणि रणजित जाधव यांनी इतर श्वानांसाठी भेटवस्तू दिली. तर कर्मचाऱ्यांतर्फे दोघांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पार पडल्यानंतर सजविलेल्या गाडीत ‘शेरू’ला बसवून ती गाडी कर्मचारी ओढत घेऊन गेटपर्यंत गेले. त्यानंतर आपल्या लाडक्या ‘शेरू’ला सर्वांनी निरोप दिला. या निरोपावेळी त्याचा सांभाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBDDS TeamबीडीडीएसPoliceपोलिसdogकुत्रा