शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सातवीतील विद्यार्थिनींना शिक्षकाने दाखविली अश्लील चित्रफीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:18 IST

सिडकोतील खाजगी शाळेत १५ दिवसांपूर्वी झाली घटना 

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्राद्वारे मिळाली माहिती मुख्याध्यापकांना बाहेर ठेवून दामिनी पथकाने केली चौकशी

औरंगाबाद : इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना शिक्षकानेच अश्लील क्लीप दाखविल्याच्या घृणास्पद प्रकाराचा विद्यार्थिनीच्या काकाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून भंडाफोड केला. पत्र प्राप्त होताच दामिनी पथकाने शाळेत आणि मुलींच्या घरी जाऊन या घटनेबाबत विचारपूस केली तेव्हा महिला अधिकाऱ्यांसमोर मुलींना रडू कोसळले. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही तक्रार नोंदविण्यास पालकांनी असमर्थता दर्शविली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा नोंदविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिडको एन-७ मधील नामवंत शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींना शिक्षकानेच अश्लील क्लीप दाखविल्याची माहिती तेथील शिक्षिकांना विद्यार्थिनींकडून समजली होती. मात्र, ज्या शिक्षकाने हा प्रकार केला तो मुख्याध्यापकाच्या जवळचा नातेवाईक आहे. याविषयी तक्रार केल्यास नोकरी धोक्यात येईल, या भीतीपोटी तेथील शिक्षिका आणि शिक्षकांनी याची वाच्यता करणे टाळले. मात्र, त्या शिक्षकावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वांची होती. हा प्रकार मुख्याध्यापकाच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी नातेवाईक आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बदली सकाळच्या सत्रातून दुपारच्या सत्रात केली.  

मुख्याध्यापकांना बाहेर ठेवून दामिनी पथकाने केली चौकशीदरम्यान, पीडित विद्यार्थिनीचे नाव असलेला एक अर्ज पोलीस आयुक्तांना काही दिवसांपूर्वी प्राप्त झाला होता. दामिनी पथकाकडे हा अर्ज चौकशीसाठी आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गत शुक्रवारी शाळेत गेले. तोपर्यंत सातवीचा वर्ग असलेल्या सकाळच्या सत्रातील शाळा सुटली होती. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पथक पुन्हा शाळेत गेले आणि त्यांनी सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मुख्याध्यापकांना वर्गाबाहेर जाण्यास सांगून पथक सातवीतील मुलींना भेटले. तेव्हा राजपूत नावाच्या एका शिक्षकाची नुकतीच बदली करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले. तीन विद्यार्थिनींना त्याने अश्लील व्हिडिओ क्लीप दाखविल्याचे दोन्ही मुलींनी सांगितले. तिसरी मुलगी शनिवारी शाळेत आली नव्हती. यामुळे दोन्ही मुलींना सोबत घेऊन पथक तिसऱ्या विद्यार्थिनीच्या घरी गेले. तेथे त्या मुलीने आई-वडिलांसमोर रडतच शिक्षकाने अश्लील क्लीप दाखविल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकारानंतर पालक आणि पीडित विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले. दामिनी पथकाने सिडको पोलिसांना अहवाल देऊन कारवाई करण्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोपी शिक्षकाविरुद्ध आम्ही फिर्याद देतो, असे म्हणाऱ्या पालकांनी सोमवारी मात्र तक्रार देण्यास नकार दिल्याचे सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी