शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 16:29 IST

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घटनेचा खुलासा झाला.

बंगळुरुतील एका प्राथमिक शाळेतून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 23 चापटा मारल्या. या घटनेने तो विद्यार्थी खूप घाबरुन गेला आहे. ज्या मुलाला प्रेमाने समजावून सांगितले जाऊ शकत होते, त्याला 23 वेळा चापटा मारण्यात आल्या. या घटनेनंतर संबंधित शिक्षकाविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

मुलाच्या पालकांनी सांगितले की, बुधवारी चन्नासंद्रा येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलाने शिक्षकांना त्यांच्या सूचना वहीत लिहून द्यायला सांगितल्या. मुलाच्या या बोलण्याने चिडलेल्या शिक्षकाने त्याला 23 चापटा मारल्या. यापूर्वी तो मुलगा गृहपाठ करत नसल्याची तक्रार त्या शिक्षकाने मुलाच्या पालकांना लिहून पाठवली होती आणि शाळेत येऊन भेटण्यास सांगितले होते. मुलाच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून त्यांच्या सूचना लेखी पाठवण्याची मागणी केली. या प्रतिक्रियेने संतप्त झालेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली.

शिक्षकाने 23 चापटा मारल्यामुलाच्या गाालावर 23 वेळा चापटा मारल्यामुळे त्याचा गाल सूजला आहे. मुलाच्या हनुवटीवर सूज आल्याचे आईच्या लक्षात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आईने मुलाला याबद्दल विचारले, त्यानंतर त्याने संपूर्ण घटना सांगितली. दुसऱ्या दिवशी मुलाचे पालक शाळेत पोहोचले आणि शाळेच्या अधिकाऱ्यांकडे या प्रकाराची तक्रार केली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे समजलेमुख्याध्यापकांनी शिक्षकाला समज देण्याऐवजी घरी पाठवले. त्यानंतर पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर पोलीस शाळेत पोहोचले. शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मागवले. फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, 30 मिनिटांत शिक्षकाने मुलाला 23 वेळा चापटा मारल्या आहेत. पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकासह इतर काही जणांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाbangalore-central-pcबंगलोर सेंट्रलPoliceपोलिस