पत्नीच्या अफेअरना कंटाळून लाइव्ह व्हिडीओ बनवत टीसीएसच्या व्यवस्थापकाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:04 IST2025-03-01T07:03:46+5:302025-03-01T07:04:18+5:30

बायको मला धमकावते. तिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. यानंतर तो रडायला लागतो.

TCS manager commits suicide while making live video after being fed up with wife's affair | पत्नीच्या अफेअरना कंटाळून लाइव्ह व्हिडीओ बनवत टीसीएसच्या व्यवस्थापकाची आत्महत्या 

पत्नीच्या अफेअरना कंटाळून लाइव्ह व्हिडीओ बनवत टीसीएसच्या व्यवस्थापकाची आत्महत्या 

आग्रा : एका टीसीएस रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाइव्ह व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. 

व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आई-बाबा मला माफ करा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते. तिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. यानंतर तो रडायला लागतो. शेवटच्या क्षणी हसतो आणि म्हणतो करायचं असेल तर नीट कर. माझ्या पालकांना हात लावू नका. मात्र, पत्नीने हे आरोप फेटाळले आहेत. 

वडील म्हणाले...
मानव शर्मा हा मुंबईत काम करत होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की, मानवचे लग्न निकितासोबत ३० जानेवारी २०२४ रोजी आग्राच्या बरहन येथे झाले होते. काही दिवसांनी सून रोज भांडू लागली. खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देऊ लागली. प्रियकरासोबत राहण्याबाबत बोलू लागली. २३ फेब्रुवारी रोजी मानवला सासरच्या मंडळींनी धमकावले. २४ फेब्रुवारीला मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: TCS manager commits suicide while making live video after being fed up with wife's affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.