शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! तरुणाचा कारमध्ये सापडला मृतदेह; 7 दिवसांपूर्वी झालेलं लग्न, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 17:45 IST

दिलप्रीत सिंह असं या चालकाचं नाव असून त्याचा मृतदेह त्याच्या इनोव्हा कारमधून सापडला आहे.

पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पटियाला जिल्ह्यातील बनूड भागात एका टॅक्सी चालकाने प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या सात दिवसांनी विष पिऊन आत्महत्या केली. दिलप्रीत सिंह असं या चालकाचं नाव असून त्याचा मृतदेह त्याच्या इनोव्हा कारमधून सापडला आहे. पोलिसांनी चालकाची पत्नी आणि सासू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, मात्र सध्या दोघीही फरार आहेत.

दिलप्रीत सिंहचे वडील बलविंदर सिंह यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे की, त्यांचा मुलगा स्वतःची इनोव्हा कार टॅक्सी म्हणून चालवत असे. काही काळापूर्वी त्याचे बार अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या जिरकपूर येथील रहिवासी मनप्रीत कौरसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी 9 जुलै 2023 रोजी लग्न केले. लग्नानंतर मनप्रीत कौर आपला मुलगा दिलप्रीत सिंह याला मनौली गावात जाण्यापासून रोखत असे. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

बलविंदर सिंहच्या म्हणण्यानुसार, दिलप्रीत सिंह पत्नी आणि सासूसोबत त्यांच्याच घरात राहू लागला. 16 जुलै 2023 रोजी दिलप्रीत सिंह त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी मनौली गावात आला होता. त्यानंतर त्याची पत्नी व सासूही तेथे पोहोचली आणि त्यांच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेत अपमानास्पद वाटून दिलप्रीत सिंह आपल्या गाडीतून निघून गेला. रात्री तो परत न आल्याने पोलिसांना माहिती देऊन त्याचा शोध सुरू करण्यात आला.

17 जुलै रोजी उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या इनोव्हा कारमधून दिलप्रीत सिंहचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलप्रीत सिंहने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, जीव देण्यापूर्वीच दिलप्रीत सिंहने पत्नीला फोन केला होता. फोनवरूनच दोघांमध्ये खूप भांडण झाले. स्टेशन हाऊस ऑफिसर बानूर किरपाल सिंह यांनी सांगितले की, टॅक्सी चालकाची पत्नी मनप्रीत कौर आणि सासू कुलदीप कौर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही फरार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी