शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

तंत्र-मंत्रानं युवतीच्या मृतदेहाला जिवंत करण्याचा प्रयत्न; दुर्गंध पसरल्यामुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:07 IST

Superstition Case : घरातील सदस्य गंगाजल पाजून आणि तंत्र-मंत्राने तिला बरे करण्याचा प्रयत्न करत होते.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे तंत्रमंत्राद्वारे मृत मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न केला जात होता. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह ५ दिवस घरात लपवून ठेवला होता आणि जादूटोणा केला जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अल्पवयीन मुलीची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नसल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. घरातील सदस्य गंगाजल पाजून आणि तंत्र-मंत्राने तिला बरे करण्याचा प्रयत्न करत होते.

डीहा गावातील रहिवासी अभय राज यादव यांची 18 वर्षीय मुलगी अंतमा यादव हिचा पाच दिवसांपूर्वी गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. मात्र त्यांनी मुलीचा अंतिम संस्कार न करता तिला जिवंत करण्यासाठी तंत्राचा जप सुरू केला. देवी येईल आणि मुलगी पुन्हा जिवंत होईल असा त्यांचा विश्वास होता.मृतदेहाचा दुर्गंध पसारल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले असता घरच्यांनी विरोध केला. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता कुजलेला मृतदेह पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. हे कुटुंबही मानसिक रुग्णांसारखे वावरत, कुजबुज करत, असे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मुलीचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.मृत मुलीची प्रकृती जवळपास महिनाभर खालावली होती. 24 जून रोजी त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. अंतीमाचा मृत्यू भूतामुळे झाल्याचा संशय कुटुंबीयांना होता. अशा स्थितीत ते तिला भूतबाधा आणि तंत्रमंत्राने जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश