शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अपघातात जखमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्याने लंपास केली १ लाख ९७ हजार असलेली बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 11:42 IST

Pune Crime News : अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर - अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने जखमी जवळ असलेली १ लाख ९७ हजार रूपये ठेवलेली बॅग चोरून नेली आहे. याप्रकरणी सुशील चंद्रकांत देसाई ( वय २९, रा. अविनाश कपूर यांचेकडे भाड्याने, शेवाळेवाडी, संपन्न होम मांजरी. ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार देसाई हे कदमवाकवस्ती ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील वेन्टाईल कंपनीमध्ये कस्टमर केअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीत दिवसभराची जमा झालेली रोख रक्कम ते स्वतः बिबवेवाडी येथील मुख्य कार्यालयात जमा करतात.                   

शुक्रवार (१३ नोव्हेंबर ) रोजी ९ वाजण्याच्या सुमारांस होंडा शाईन दुचाकी क्रमांक एमएच १२ एलई ३५२९ वरून एकटेच बिबवेवाडी येथील मुख्य कार्यालयात दिवसभर जमा झालेली रोख रक्कम १ लाख ९७ हजार ही एका काळे रंगाचे बॅगमधून घेवून जात होते. रात्री ९ - १५ वाजण्यांच्या सुमारास ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत समोरील चंद्राई हार्डवेअर समोर आले असता सोलापुर - पुणे महामार्गावरून त्यांचे पुढे चाललेला टॅकर ( क्रमांक माहीत नाही ) अचानक थांबलेने दुचाकी मागून धडकल्याने अपघात झाला. यामुळे देसाई यांचा डावा गाल व गळयावर मार लागला तसेच उजवे हाताला मार लागून फॅक्चर झालेने त्यांना चक्कर येत होती. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या खाजगी रूग्णालयात पाठवले. औषधोपचार सुरू झालेवर कंपनीचे सुरक्षारक्षक जनार्दन नवले व कॅशियर निखिल गवळी हे तेथे पोहोचले त्यावेळी देसाई यांनी त्यांना अपघाताचे वेळी जवळ असलेली काळे रंगाची रोख रक्कम ठेवलेली बॅग अपघाताचे ठिकाणी आहे काय बघून या असे सांगितले. दोघे त्या ठिकाणी गेले. तेथील लोकांकडे विचारपूस करून परीसरात शोध घेतला परंतू बॅग मिळाली नाही. म्हणून त्यांनी अपघाताचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोटयाने त्यांचे ताब्यातील काळे रंगाचे बॅगमधील १ लाख ९७ हजार रूपये रोख चोरून नेला आहे, म्हणून माझी अज्ञात टॅकर वरील चालक व अज्ञात चोरटया विरूध्द तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस