शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:51 IST

एका महिलेने आपल्या सासऱ्यावर सातत्याने लैंगिक छळ, विनयभंग आणि शारीरिक संबंधांसाठी ४०,००० रुपयांचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आग्रा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सासऱ्यावर सातत्याने लैंगिक छळ, विनयभंग आणि शारीरिक संबंधांसाठी ४०,००० रुपयांचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात अधिक धक्कादायक बाब म्हणजे, महिलेने आपल्या पतीवरही सासऱ्याला साथ दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पीडित महिलेचे लग्न ८ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले होते. महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे सासू-सासरे नेहरून इन्क्लेव, शमशाबाद रोड येथे राहतात आणि लग्नापासूनच सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. सासरे तिच्या खोलीत न सांगता यायचे आणि तिच्याशी अश्लील बोलायचे, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

पतीकडूनही पाठिंबा नाही

पीडितेने अनेकदा याबद्दल आपल्या पतीकडे तक्रार केली, परंतु पतीने कोणतीही कारवाई केली नाही. उलट, पतीने कथितरित्या तिला सांगितले की, "वडिल वृद्ध आहेत, त्यांना काही बोलता येणार नाही. त्यामुळे ते जसे म्हणतात तसे कर." तक्रारीत असाही आरोप केला आहे की, जेव्हा महिला पतीचे ऐकत नसे, तेव्हा पती तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा आणि तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.

माहेरी येऊनही दिला त्रासपीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, १० जून २०२५ रोजी तिने पुन्हा एकदा आपल्या पतीकडे सासऱ्याच्या कृत्यांची तक्रार केली. यावर पतीने तिला म्हटले की, "तू त्यांच्या मनासारखे कर, माझीही तीच इच्छा आहे." या बोलण्याने दुखावलेल्या महिलेने आपले माहेर आग्रा गाठले.

१२ जून २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास महिलेचे सासरचे लोक तिच्या माहेरी पोहोचले. जेव्हा महिलेची आई चहा बनवण्यासाठी गेली, तेव्हा सासरे सुनेच्या जवळ बेडवर बसले आणि वाईट हेतूने तिच्या शरीरावर हात फिरवत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगू लागले. महिलेने धाडस दाखवत याला विरोध केला आणि आपल्या मोबाईलवरून या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो तिच्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध आहे.

फोनवरूनही त्रास सुरूच

या घटनेनंतर पीडित पत्नीने आपल्या पती, सासू आणि नातेवाईकांकडे फोनवरून तक्रार केली. मात्र, तिच्या पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने पोलिसांना हे देखील सांगितले आहे की, तिच्या सासऱ्याने व्हॉट्सॲप चॅटद्वारे आपली चूक मान्य केली आहे आणि तिला ४०,००० रुपये देऊन शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिषही दाखवले आहे.

'असा' शिकवला धडाया सर्व प्रकाराने हतबल झालेल्या पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम ७५ (लैंगिक छळ), ११५(२) (धमकी), ३५१(२) (गुन्हेगारीसाठी बळाचा वापर), आणि ३५२ (हल्ला) अंतर्गत एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली