शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 20:04 IST

रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाडीच्या पलीकडे नेवून तलवारीने वार

देहूरोड : देहूरोड -कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते विकासनगर सेवा रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या युवकाला हॉटेलच्या बाहेर ओढत नेऊन तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. हल्लेखोर  दुचाकीवरून आले होते. जखमी युवकावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  प्रशांत भालेराव  ( वय अंदाजे २०  रा. निगडी  )असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार किवळे येथील एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी तीन युवक आले होते. त्यावेळी त्यांच्यामागून आणखी तीन -चार युवक हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या तिघांपैकी एकाला हॉटेल बाहेर  सेवा रस्त्यावर ओढत नेले. रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाडीच्या पलीकडे नेवून त्याच्यावर तलवारीने वार केले. यात त्याचे एक बोट तुटले असून डोक्याला तसेच पायाला दोन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमीवर उपचार सुरु आहेत. हॉटेलजवळ असलेल्या एका डॉक्टरने जखमी युवकास देहूरोड येथे रुग्णालयात दाखल केले. घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निगडी येथील एका महाविद्यालयाजवळ काही युवकांची झालेली भांडणे सोडवायला संबंधित जखमी गेला होता. हल्ला केल्यानंतर मुकाई चौक मार्गे रावेतच्या दिशेने हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्हीत संबंधित घटना कैद झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. युवकावरील हल्ल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून पुढील तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :kiwaleकिवळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस