अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 07:12 PM2021-09-20T19:12:21+5:302021-09-20T19:22:27+5:30

महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजमधील बाघम्बरी गद्दी मठात आढळला असून, पोलिसांनी परिसरात मोठा फौज फाटा तैनात केला आहे.

Suspicious death of Akhada Parishad president Mahant Narendra Giri, body found strangled | अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

googlenewsNext

प्रयागराज: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळा धाव घेत संपूर्ण परिसराला सील केलं आहे. तसेच, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करणार आहेत.

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच काळापासून तणावाखाली होते
महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे.  नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे.

Web Title: Suspicious death of Akhada Parishad president Mahant Narendra Giri, body found strangled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.