नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात शनिवारी दुपारी भररस्त्यावर तरुणावर विधीसंघर्षग्रस्त बालकाने चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. तुषार विजय झोडे (१९, रा. ब्राह्मणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुषार हा कळमेश्वर शहरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तरुणीची बोलत असताना तिथे विधीसंघषग्रस्त बालक आला आणि त्याने तुषारवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धावपळीत विधीसंघर्षग्रस्त बालक घटनास्थळाहून पळून गेला. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला कळमेश्वर शहरात दाखल झाले होते. या घटनेमुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:49 IST
ही हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय
ठळक मुद्देतुषार विजय झोडे (१९, रा. ब्राह्मणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.या घटनेमुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.