शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदार महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:12 IST

रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्याकडून छेडछाड होण्याची घटना गंभीर असल्याने तातडीने कारवाई शहरात महिंलावरील अत्याचाराच्या घटनात वाढ

पिंपरी : पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. चिखली पोलीस ठाण्याअंतर्गतच्या साने चौक पोलीस चौकीतील सहायक फौजदार रामनाथ पालवे असे निलंबन कारवाई झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीचे भांडण झाले. त्यामुळे ९ आॅक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला पोलीस चौकीत तक्रार नोंदविण्यास गेली. तेथे सहायक फौजदार रामनाथ पालवे होते. त्यांनी महिलेचे म्हणणे ऐकुन घेत असताना, त्या महिलेशी गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या खांद्यावर हात ठेवुन बोलत असल्याने ही महिला घाबरली. पोलीस अधिकाऱ्याचे वर्तन ठीक नसल्याने तक्रार नोंदवुन ही महिला ११ च्या सुमारास तेथून निघून गेली. तक्रारअर्जावर महिलेने तिचा मोबाईल क्रमांक दिला होता. सहायक फौजदार पालवे यांनी त्याच रात्री दोनच्या सुमारास महिलेशी मोबाईलवरून संपर्क साधला. तिच्याशी अश्लिल संभाषण केले. तसेच आता सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारपूस केली. घडल्या प्रकाराने महिलेची मनस्थिती बिघडली. या महिलेने शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांची भेट घेतली. त्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. कुदळे पीडत महिलेसह अन्य महिलांना घेवून पोलीस ठाण्यात गेल्या. पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांची भेट घेतली. महिलांनी केलेल्या तक्रारीची प्रत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनाही देण्यात आली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेवुन सहायक फौजदार पालवे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. शहरात महिंलावरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कधी पीडित महिलाची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. तर कधी तक्रार देण्यास आलेल्या महिलेच्या असहयतेचा गैरफायदा उठविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत आहे. तक्रारदार महिलेची  पोलीस अधिकाऱ्याकडून छेडछाड होण्याची घटना गंभीर असल्याने तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsuspensionनिलंबनsexual harassmentलैंगिक छळ