शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दोषारोपपत्रात खाडाखोड केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 7:15 PM

Crime News : चाकण पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये, असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात (चार्जशीट) व्हाईटनर लावून कलम खोडून संशयित आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. ९) याबाबत आदेश दिले. 

चाकण पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये, असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात जुलै २०२० मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र या दोषारोपपत्र आणि इतर कागदपत्रांवर व्हाईटनरचा वापर करण्यात आला. खाडाखोड करून व्हाईटनरने सरकारी दस्तावेजात बदल करण्यात आले. संबंधित गुन्ह्याच्या प्रकरणात संशयित आरोपीला मदत करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे दिसून येते. यातून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ठपका ठेवत पोलीस नाईक जायभाये यांचे निलबंदन करण्यात आले.

प्रशिक्षण शिबिर टाळल्याने निलबंनाची कारवाईपोलिस कर्मचाऱ्यांचे रामटेकडी येथे २२ दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्यासाठी शहर पोलीस दलातील काही पोलिसांची निवड करण्यात आली. मात्र, या शिबिरातील शहरातील तीन कर्मचारी उपस्थित राहिले नाहीत. तसेच, वरिष्ठांना माहिती न देता ते परस्पर रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी दिले. श्रीकांत हरिशचंद्र शिंदे (नेमणूक वाकड), विजय वसंत गायकवाड (नेमणूक वाकड), जुम्मा सिकंदर पठाण (नेमणूक चिखली), असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. प्रशिक्षण शिबिर टाळण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस