शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अनैतिक संबंधांचा संशय, जमावाने तरुण आणि महिलेला तीन दिवस कोंडून ठेवले, नंतर निर्वस्त्र करून गावभर फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:44 IST

Crime News: अनैतिक संबंधांचा आरोप करून एक तरुण आणि एका महिलेला तीन दिवस कोंडून ठेवल्याची आणि नंतर निर्वस्त्र करून संपूर्ण गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रांची - अनैतिक संबंधांचा आरोप करून एक तरुण आणि एका महिलेला तीन दिवस कोंडून ठेवल्याची आणि नंतर निर्वस्त्र करून संपूर्ण गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime News) या प्रकरणी पोलिसांनी गावच्या सरपंचासह चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी दुमका जिल्ह्यातील बडतल्ली पंचायतीमधील मयूरनाचा गावात घडली. ग्रामस्थांनी या प्रेमी युगुलाला नग्नावस्थेमध्ये गावातून फिरवले. यादरम्यान, त्यांचा व्हिडीओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पीडितांनी सोमवारी रात्री उशिरा मुफ्फसिल ठाण्यात जाऊन न्यायाची मागणी केली. (Suspecting an illegal relationship, the young man and woman were detained for three days, then stripped naked and taken around the village)

विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराला जमावाने नग्न करून गावभर त्यांची धिंड काढल्याचा आरोप आहे. मयूरनाचा गावामध्ये सदर महिलेचे सासर आहे. या महिलेचा पती गेल्या वर्षभरापासून दुमका येथील तुरुंगात आहे. ही महिला दुमका येथे मोलमजुरी तिचे आणि तिच्या तीन मुलांचे पालनपोषण करते. मोलमजुरी करत असतानाच तिची ओळख कोल्हडिया गावातील एका तरुणाशी झाली. सदर युवक सुद्धा विवाहित असून तो दोन मुलांचा पिता आहे. सोमवारी संध्याकाळी तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. तेव्हा गावातील चार-पाच तरुणांनी या दोघांना पकडले. त्यानंतर गावातील ५०-६० लोक गोळा झाले. त्यांनी ही महिला आणि तरुणाच्या अंगावरचे कपडे उतरवून त्यांना विवस्त्र केले. त्यानंतर या दोघांची नग्नावस्थेत गावातून धिंड काढत त्यांना गावाबाहेर नेले. सदर तरुणी आणि महिला हे वेगवेगळ्या समाजातील आहेत.

दरम्यान, मयूरनाचा गावाच्या शेजारी असलेल्या सकरभंगा गावातील काही लोकांनी जेव्हा हा लाजिरवाणा प्रकार पाहिला तेव्हा याचा विरोध केला. तेवढ्यात दुमका मुफस्सिल पोलीस ठाण्यातील पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर महिला आणि तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणले. दुमका मुफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रभारी इन्स्पेक्टर उमेश राम यांनी सांगितले की, या प्रकरणी ४ ज्ञात आणि ५०-६० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिस