बीड - बलात्कार पीडित महिलेला मानसिक आधार द्यायचे राहिले दूर, पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. दरम्यान, पीडित महिलेला विरोध करत या गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या दिल्याचेही समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर गावातील चार जणांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ही बाब गावकऱ्यांना रुचली नव्हती. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली.
संतापजनक! चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने बलात्कार पीडितेला केले हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 12:17 IST
Beed Crime News : पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संतापजनक! चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने बलात्कार पीडितेला केले हद्दपार
ठळक मुद्देपीडित महिलेवर गावातील चार जणांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार केला होतात्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीया प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली