Sushil Kumar : सुशील कुमारला फासावर लटकवा, तो राजकीय दबाव वापरू शकतो; सागर राणाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:02 PM2021-05-24T14:02:00+5:302021-05-24T14:02:19+5:30

Sushil Kumar should be hanged : He can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार ( Sushil Kumar) याची ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.

Sushil Kumar should be hanged, he can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents | Sushil Kumar : सुशील कुमारला फासावर लटकवा, तो राजकीय दबाव वापरू शकतो; सागर राणाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

Sushil Kumar : सुशील कुमारला फासावर लटकवा, तो राजकीय दबाव वापरू शकतो; सागर राणाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

googlenewsNext

Sushil Kumar should be hanged : ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार ( Sushil Kumar) याची ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनकडच्या हत्येप्रकरणी सुशीलला पोलिसांनी अटक केले. या प्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी सागरच्या कुटुंबीयांनी केली आहे. सुशील या प्रकरणात त्याच्या राजकीय ओळखींचा वापर करू शकतो, अशी भीती सागरच्या कुटुंबीयांना वाटत असून त्यांनी सुशीलला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.  Sushil Kumar should be hanged : He can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents

सागरच्या हत्येनंतर 17 दिवसांपासून फरार असलेल्या सुशीलला (Sushil Kumar) दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याला दिल्ली न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी सुशील कुमारच्या साथीदारालादेखील अटक केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे.  


''हा गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा नाही. त्यानं जिकंलेली सर्व पदकं काढून घेतली पाहिजेत. पोलीस योग्य तपास करतीलच, परंतु सुशील त्याचा राजकीय प्रभाव वापरू शकतो, ''असं सागर राणाच्या आईने  म्हटले आणि त्यांनी सुशीलला फाशी देण्याची मागणी केली आहे. सागरचे वडील अशोक हे  बेगमपूर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी सुशीलच्या गुन्हेगारी संबंधांचाही तपास करण्याची मागणी केली आहे. 

''आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत. फरार झाल्यानंतर तो कुठे होता? त्याला आसरा कोणी दिला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या गँगस्टरसोबत त्याचे संबंध आहेत. त्याला फासावर लटकवलं पाहिजे म्हणजे लोकांना धडा मिळेल,'' असंही ते म्हणाले. 

ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार होता. सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


सुशील कुमारला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्य़ाची मागणी करण्यात आली. मात्र, सुशीलच्या वकिलांनी यास विरोध केला. सुशील कुमारने हत्या केली त्या दिवशी एकूण पाच जणांना उचलून आणण्यात आले होते. त्यांना छत्रसाल स्टेडिअममध्ये आणून जणावरांसारखी मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या सर्व कटाचा तपास करण्य़ासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच आरोपी सुशील कुमारचे असोदा गँगशी संबंध असल्याचे सांगितेले जात आहे. सोनू नावाचा जखमीदेखील एका गँगचा आहे, यामुळे या कटाचा तपास करण्यासाठी ही कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. 

Web Title: Sushil Kumar should be hanged, he can use his political links to influence investigation: Sagar Rana's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.