शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सुशांतच्या फ्लॅटची सीबीआयच्या पथकाने ६ तासाहून अधिक वेळ केली तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 19:50 IST

Sushant Singh Rajput Suicide : कुपर रुग्णालयातील डॉक्टराचेही जबाब नोंदविले

ठळक मुद्देकूपर रुग्णालयात जाऊन 14 जूनला कक्षात ड्युटीवर असलेले आणि  शवविच्छेदन करणाऱ्या अशा एकूण पाच जणाचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने शनिवारी वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटची  कसून तपासणी केली. सुमारे सहा तासाहून अधिक काळ  चाललेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी फ्लॅटबरोबरच पुर्ण इमारतीचा परिसर, टेरेस धुडाळून काढीत काही नोंदी घेतल्या. त्याचबरोबर सुशांत सिहच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून तपासण्यात आला. तत्पूर्वी कूपर रुग्णालयात जाऊन 14 जूनला कक्षात ड्युटीवर असलेले आणि  शवविच्छेदन करणाऱ्या अशा एकूण पाच जणाचे जबाब नोंदवून घेण्यात आले.     सुशांतसिहच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आलेल्या पथकाने शुक्रवारी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे शुक्रवारी मुंबईपोलिसांकडून ताब्यात घेतली होती. शनिवारी सकाळपासून त्यांनी तपासाला गती दिली.15 अधिकाऱ्यांचे पथकाच्या पाच स्वतंत्र  टीम बनविण्यात आल्या.फॉरेंसिक एक्स्पर्टसह  त्यांना माहिती व सहकार्य  करण्यासाठी मुंबई पोलिसांचे अधिकारीही सोबत होते.   एका पथकाने बांद्रा पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना सोबत घेऊन सुशांतच्या देहाचे विच्छेदन केलेल्या कूपर रुग्णालयात पोहचले. त्याचे पीएम रिपोर्ट घेऊन त्यादिवशी त्या कक्षात ड्युटी असलेल्या आणि शवविच्छदन करणाऱ्याचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पथक सुशांत रहात असलेल्या सोसायटीत गेले. त्यावेळी त्याच्या समवेत सिद्धार्थ पिठाणी, त्याचा  स्वयंपाकी नीरज व दीपेश यांनाही सोबत घेण्यात आले. पुर्ण इमारत, आजूबाजूचा परिसर आणि टेरेसची सूक्ष्म पाहणी करण्यात आली. त्याचवेळी एका काही अधिकाऱ्यांनी  हे सुशांतचा बेडरूममध्ये सिद्धार्थ, नीरज व दीपेश यांनी  दिलेल्या माहिती आणि पोलिसांच्या पंचनाम्याचा आधारे  'सीन ऑफ क्राईम रिक्रिएट"  करण्यात आला. सुमारे सहा तासाहून अधिक काळ फ्लॅटमध्ये थांबून होते. एका टीमने इमारतीत सुशांतच्या शेजारी रहात असलेल्याकडे चोकशी केली. यावेळी पूर्ण परिसर सील करण्यात आला होता.सर्व तपासाचे चित्रीकरणसीबीआयच्या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडीओ शुटींग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली जात होती. त्याचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  पोलिसांकडून पीएम लवकर करण्याची सूचना  सुशांतसिंहच्या शवविच्छेदन केलेल्या कुपर रुग्णालयात संबंधित डॉकटराचे जबाब नोंदविण्यात आले. त्यावेळी इतक्या तत्परतेने 'पीएम' करण्यात आले,  अशी विचारणा केली असता, मुंबई पोलिसांकडून तशा सूचना करण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले. त्याच्याबरोबर सुशांतचा   मृतदेह पहिल्यादा बघितलेल्या नीरज आणि पिठानीचेही जबाब नोंदविण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिसMumbaiमुंबईdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल