शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:08 IST

Sushant Singh Rajput Suicide : येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.

ठळक मुद्दे महेश भट्ट यांना मुंबई पोलिसांनी आज दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे तपासाला गती येणार असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भ

मुंबईपोलिसांकडून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक दिग्गज लोकांची विचारपूस केली जात आहे. यासाठी दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांना आता वांद्रे पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. महेश भट्ट यांना मुंबईपोलिसांनी आज दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. मात्र, त्यांचा जबाब सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास नोंदविण्यात आला. येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.महेश भट्ट यांना पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि २ अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. रविवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महेश भट्ट आणि करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी केली जाईल. नंतर असे म्हटले होते की करणचे मॅनेजर नसून धर्म प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांना देखील जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले आहे. आता महेश भट्ट यांनी आपला जबाब नोंदवला असून या प्रकरणात कोणता मोठा खुलासा होणार आहे याकडे बॉलिवूड सृष्टीचे लक्ष वेधले आहे.महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोठे विधानएएनआयशी बोलताना अनिल देशमुख यांनी सुशांत प्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करण्यास सांगितले होते. या प्रकरणात महेश भट्ट यांचा जबाबत नोंदविण्यात येईल, असे ते म्हणाले होते. तसेच अनिल देशमुख यांनी असेही म्हटले आहे की, या प्रकरणात करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीदरम्यान प्रश्न विचारले जातील . सुशांतच्या आत्महत्येला आता 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, दरम्यानच्या काळात पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. याप्रकरणी दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंद करण्यात येईल. तर, करण जोहरच्या मॅनेजरचीही चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास करण जोहरला पोलिसांकडून बोलविण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे तपासाला गती येणार असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली आहे.

 

 

''

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसMahesh Bhatमहेश भटMumbaiमुंबई