शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 14:03 IST

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती.

ठळक मुद्देबिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. श्रुतीनंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची शनिवारी चौकशी होणार आहे. त्यालाही ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहेत.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाला आहे. ईडी आता त्याची चौकशी करत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती. ईडीने रियाकडे सुशांतच्या खात्यातील १५ कोटींच्या व्यवहारांबाबत ९ तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. तर दुसरीकडे सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांकड़ून चौकशी सुरू होती.बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. गुरूवारी ईडीने रियाला समन्स बजाविले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने वकीलामार्फत केली होती. ईडीने ती फेटाळली आणि चौकशीसाठी हजर न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करताच, शुक्रवारी रिया चौकशीसाठी सकाळी ११.५५ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी तिचा भाऊ शोविकही तिच्यासोबत होता.रियाचे खार आणि नवी मुंबईत दोन फ्लॅट आहेत. यापैकी खार येथील फ्लॅट तिने २०१८ मध्ये आई आणि स्वत:च्या नावावर खरेदी केला. त्याची किंमत ७६ लाख असून, अन्य कर धरुन हा फ्लॅट ८० लाखांवर गेला आहे. मात्र सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी तिने यात गुंतवणूक केल्याचे समजते. तसेच आतापर्यंत ४५ टक्के पैसे तिने दिल्याचेही संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर विशाल जाधव यांनी सांगितले. मात्र रियाचे वार्षिक उत्पन्न १० ते १४ लाख असताना तिने एवढी गुंतवणूक कशी आणि कुठून केली? याबाबतही ईडी अधिक तपास करत आहेत. विविध कंपनीबाबत, तसेच सुशांतकडून आतापर्यंत किती पैसे घेतले? अशा ५० प्रश्नांबाबत ईडी चौकशी करत आहे. तिच्याकडे गेल्या पाच वर्षांत आयटीआर, बँक स्टेटमेंट मागण्यात आले आहे. मात्र कागदपत्रे नसल्याने तिने वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे पाठविणार असल्याचे सांगितले होते. 

दरम्यान, सुशांतची माजी मॅनेजर आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीनेही ईडीच्या समन्सनुसार दुपारी दोन वाजता कार्यालय गाठले. तिचीही चौकशी करण्यात आली. श्रुतीनंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची शनिवारी चौकशी होणार आहे. त्यालाही ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहेत.नवी मुंबईतील कंपनीची झाडाझडतीपार्टनरशीपमध्ये सुशांतने ३ कंपन्या सुरू केल्या. यात नवी मुंबईतील सुशांत, रिया, शोविकने तयार कलेल्या विविड्रेज रिआलिटी कंपनीकडे ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीसाठी वापरलेले कार्यालय रियाचे वडील इंद्रजीत यांच्या नावे आहे. तसेच रियाने या कंपनीचे नावही बदलल्याचे समोर आले आहे.

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती