Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 09:45 PM2020-09-18T21:45:24+5:302020-09-18T21:45:48+5:30

Sushant Singh Rajput Case : गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

Sushant Singh Rajput Case: Hearing of accused's bail application adjourned | Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Next
ठळक मुद्दे त्या आरोपीकडे ड्रग मिळाले नसेल तरी तपास यंत्रणा त्यांचे काम करू शकते,' असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.  

मुंबई : सुशांत सिंग राजपूत याला ड्रग्स पुरवत असल्याचा आरोप करत एनसीबीने अटक केलेल्या सॅम्युअल मिरांडा,  दीपेश सावंत व अन्य एकाच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी तहकूब केली.

मिरांडा, सावंत व ड्रग विकणारा अब्दुल बसित परिहार  या तिघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे या याचिकांवर सुनावणी होती. गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

एनसीबीने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले की, या सर्व आरोपींना त्यांचा ड्रग्स विकत घेण्यात व त्यासाठी पैसे उपलब्ध करण्यामध्ये त्यांची असलेली भूमिका महत्त्वाची आहे.काही आरोपींकडे ड्रग्स आढळले नाही. तर ज्या आरोपींकडून ड्रग्स जप्त करण्यात आले त्यांच्याकडे अत्यल्प प्रमाणात ड्रग्स होते. त्यामुळे या आरोपींना जामीन मिळू शकतो, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

अत्यल्प प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलेल्या आरोपीला जामीन मिळू शकतो की नाही, यावर सर्व पक्षांनी पुढील सुनावणीत आपापले मत मांडावे, असे  न्या. कोतवाल यांनी म्हटले. 'तुम्ही कदाचित विक्रेते असाल म्हणून तुमच्याकडे काहीही ड्रग नसेल. पण ड्रगची खरेदी- विक्रीची साखळी तोडणे आवश्यक आहे. हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आरोपीची चौकशी करण्यास मोकळी आहे. त्या आरोपीकडे ड्रग मिळाले नसेल तरी तपास यंत्रणा त्यांचे काम करू शकते,' असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.  

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

Web Title: Sushant Singh Rajput Case: Hearing of accused's bail application adjourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.