शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती एनसीबीच्या चौकशीचा फास; ड्रग तस्करीचे कनेक्शन तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 01:44 IST

रियाच्या मोबाइलमधील चॅट तपासले असता तिने ड्रग पेडलर जया सहाबरोबर सुशांतला किती ड्रग्ज द्यायचे यासंदर्भात विचारल्याचे समोर आले आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील प्रमुख संशयित, सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती आता ईडी, सीबीआयबरोबरच केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण पथकाने (एसीबी) चौैकशीचा फास आवळला आहे.

ड्रगच्या सेवनाबाबत तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीचे पथक लवकरच तिची चौकशी करणार आहे. दरम्यान, सीबीआयचे पथकही तिला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वांद्रे पोलिसांची चौकशीगेल्या सहा दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने बुधवारी वांद्रे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी भूषण बेळणकर, उपनिरीक्षक वैभव जगताप यांच्याकडे तसेच सुशांतचा नोकर नीरज सिंग आणि त्याच्या फ्लॅटच्या सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली. डीआरओच्या गेस्ट हाउसमध्ये त्यांची सुमारे पाच तास सखोल चौकशी करण्यात आली. बेळणकर व जगताप यांनी आतापर्यंत केलेला तपास तसेच ५६ जणांच्या नोंदविलेल्या जबाबाबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भाड्यासाठी केले कॉल - संदीप सिंहसुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक संदीप सिंह याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. १४ ते १६ जूनपर्यंत तो सुशांतचे शव नेणाऱ्या शववाहिका चालकाच्या संपर्कात होता. त्याने त्याला सहा वेळा कॉल केल्याचे समोर आले आहे. आपण शववाहिका चालकाला भाडे देण्यासाठी कॉल केले, असे त्याने सांगितले.

रियाच्या मोबाइलमधील चॅट तपासले असता तिने ड्रग पेडलर जया सहाबरोबर सुशांतला किती ड्रग्ज द्यायचे यासंदर्भात विचारल्याचे समोर आले आहे. याच्या अनुषंगाने ईडीने तिची चौकशी करावी यासंदर्भात एनसीबीला पत्र दिले होते. त्यानुसार एनसीबीने तिच्या चौकशीचा निर्णय घेतल्याचे या विभागाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सांगितले.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थCBIगुन्हा अन्वेषण विभाग