सुरतच्या दोघांकडून ४ किलो गांजा विक्री होण्यापूर्वी पकडला, दोंडाईचा पोलिसांची कारवाई
By देवेंद्र पाठक | Updated: September 15, 2023 14:08 IST2023-09-15T14:07:54+5:302023-09-15T14:08:10+5:30
जाकीर शेख शकील शेख (वय २५) आणि अबरार खान अयुब खान पठाण (वय २४) दोन्ही सुरत यांना अटक करण्यात आली.

सुरतच्या दोघांकडून ४ किलो गांजा विक्री होण्यापूर्वी पकडला, दोंडाईचा पोलिसांची कारवाई
धुळे : दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीच्या पुढे संशयितरीत्या उभ्या असणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून २४ हजार ३०० रुपयांचा ४ किलो १५० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली. जाकीर शेख शकील शेख (वय २५) आणि अबरार खान अयुब खान पठाण (वय २४) दोन्ही सुरत यांना अटक करण्यात आली.
दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीच्या पुढे नंदुरबार रस्त्यावर असलेल्या हॉटेल रॉयलच्या पुढे दोन जण लाल रंगाची बॅग घेऊन संशयितरीत्या उभे असल्याची गोपनीय माहिती दोंडाईचा पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. गस्तीवरील पथकाने जावून त्यांची चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या लाल रंगाची पिशवीची तपासणी केली असता ४ किलो १५० ग्रॅम वजनाचा २४ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.
याशिवाय १ हजाराचा अणि २० हजाराचा असे दोन मोबाइल, २ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जाकीर शेख शकील शेख (वय २५) आणि अबरार खान अयुबखान पठाण (वय २४) (दाेन्ही रा. उमरवाडा, रिंगरोड, सुरत) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार घटनेचा तपास करीत आहेत.