शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवक महेश पाटीलचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 13:50 IST

जानेवारी  2018  मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिली होती.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नगरसेवक महेश पाटील यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वकीलांनी दिली आहे. 

जानेवारी  2018  मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. या अटक आरोपींनी पोलिसांच्या तपासात माहिती दिली की, अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी भाजप नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिली होती. या प्रकरणी पोलिस अधिकारी व्यंकटेश आंधळे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर नगरसेवक महेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात व उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.त्यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. त्यापश्चात महेश पाटील पोलिसांना शरण आले. पोलिसानी त्यांना अटक केली. दहा दिवसाच्या पोलिस कोठडीपश्चात महेश पाटील यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्न पोलिसांनी दाखल केले आहे. महेश पाटील यांच्यासह अन्य दोन जणांनी कल्याण न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. कल्याण न्यायालयाने जामीन नाकारल्यावर महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. महेश पाटील यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्च नाकारला असल्याची माहिती कुणाल पाटील यांचे वकील डी. एन. रे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयkalyanकल्याणMurderखून