शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh: परमबीर सिंहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 05:58 IST

सर्वोच्च न्यायालयात  केलेल्या आपल्या ताज्या याचिकेत सिंह यांनी राज्य सरकार आणि त्याच्या यंत्रणांकडून माझ्या अनेक चौकशा केल्या जात आहेत, असा आरोप केला आहे.

 नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नव्याने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या सुरू असलेल्या सगळ्या चौकशा महाराष्ट्राबाहेर सीबीआयसारख्या स्वतंत्र संस्थेकडे पाठवाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तपदावरून दूर करून राज्याच्या होमगार्डचे जनरल कमांडर बनवले गेले होते. सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

सर्वोच्च न्यायालयात  केलेल्या आपल्या ताज्या याचिकेत सिंह यांनी राज्य सरकार आणि त्याच्या यंत्रणांकडून माझ्या अनेक चौकशा केल्या जात आहेत, असा आरोप केला आहे. या चौकशा महाराष्ट्राबाहेर हलवण्यात याव्यात आणि त्यांची चौकशी सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडून केली जावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. सुटीतील न्यायमूर्ती विनीत सरन आणि बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होईल, असे परमबीर सिंह यांचे वकील मुकुल रोहटगी यांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी या याचिकेत राज्य सरकार, सीबीआय आणि महाराष्ट्राचे पोलीसप्रमुख यांना प्रतिवादी केले आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग