अजबच! केक, पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना ड्रग्सचा पुरवठा; NCBने बेकरीवर टाकला छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:22 IST2021-06-13T19:20:45+5:302021-06-13T19:22:44+5:30
NCB raids bakery : मालाड पूर्वेतील ऑर्लेम येथे हा छापा टाकून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.

अजबच! केक, पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना ड्रग्सचा पुरवठा; NCBने बेकरीवर टाकला छापा
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मोठी कारवाई करत एका बेकरीवर छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई यशस्वी ठरली. कारण या बेकरीमध्ये महागडा १६० ग्रॅम गांजा मिळाला आहे. एनसीबीने पहिल्यांदाच अशा ड्रग्ज बेकरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मालाड पूर्वेतील ऑर्लेम येथे हा छापा टाकून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.
एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना १६० ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला. एनसीबीने काल मुंबईच्या ऑर्लेम, मालाड येथे ८३० ग्रॅम एडिबल वीड पॉट ब्राउन @ एडिबल कॅनाबीस व35 ग्रॅम मारिजुआनाचे एकूण १० नॉन ब्राऊनी केक्स जप्त केले आणि एल्स्टन @ फर्नांडिस नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. पुढील कारवाईदरम्यान एनसीबीने वांद्रे येथील जगत चौरसिया नावाच्या मुख्य पुरवठादारास काल रात्री उशिरा १२५ ग्रॅम मारिजुआनासह अडवले.
एनसीबी ब्रॉनी वीड पॉट केक्सद्वारे तरुण पिढीतील पदार्थांचे सेवन करण्याचा एक नवीन ट्रेंड शोधून काढला. त्यानुसार ड्रग्स मिश्रित केक्स बेक केले जाते. भारतातील हे पहिले प्रकरण आहे ज्यात ड्रग्स केक बेकिंगसाठी वापरला जातो. एनसीबीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत.