शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेने घेतला चिमुकल्याचा जीव; करंट लागला म्हणून 5 वर्षीय मुलाला मातीखाली पुरुन ठेवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 08:29 IST

Superstition e rickshaw current 5 year old son : अंद्धश्रद्धेने एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच एक भयंकर घटना घडली आहे. अंद्धश्रद्धेने एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला करंट (Electric Shock) लागला होता. मात्र  या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात लगेच न नेता त्याच्यावर घरगुती उपचार करण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला आहे. करंट लागला म्हणून चिमुकल्याला मातीखाली पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील शिशगड परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. याठिकाणी ई रिक्षा चालवणारे रिक्षा चालक भूपेंद्र यांची रिक्षा घराबाहेर चार्ज होत होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा करण हा त्याठिकाणी आला. मोकळ्या तारेशी त्याचा संपर्क आला आणि त्याला करंट लागला. मुलाला जोरात शॉक बसला होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी कुटुंबीयांनी त्याच्यावर घरगुती उपचार सुरू केले. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी मातीखाली पुरून ठेवण्यात आलं. 

जवळपास एक तास या मुलाला तसंच ठेवण्यात आलं. या दरम्यान मुलाला प्रचंड त्रास होत होता. पण तरीही त्याला तसंच ठेवण्यात आलं. त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही म्हणून त्याला रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. एका नातेवाईकाच्या सांगण्यानुसार चिमुकल्याला मातीखाली ठेवण्यात आलं होतं. पण जर वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव वाचवण्यात यश आलं असतं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार; मोबाईलवर Video पाहून वडिलांना मोठा धक्का

एका 10 वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला तो व्हिडीओ मुलीच्या वडिलांना देखील मिळाला. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला आणि त्यानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल